ट्रेंड – अशी चिक मोत्याची माळ… चिमुकलीचा सुपर डान्स

सोशल मीडियावर लहान मुलांच्या व्हिडीओला खूप चांगला प्रतिसाद मिळतो. लहान मुलांचे व्हिडीओ खूप व्हायरल होतात. एका चिमुकलीचा असाच एक गोड व्हिडीओ व्हायरल होतोय. ‘अशी चिक मोत्याची माळ’ या गीतावर मुलीने खूप सुंदर डान्स केला आहे. तिच्या चेहऱयावरील हावभाव आणि तिचा गोड डान्स पाहून सारे तिचे कौतुक करत आहेत. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @pawanbankar_official या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत 10 लाखांहून अधिक ह्यूज आणि हजारो लाईक्स मिळाल्या आहेत. एकेकाळी ‘अशी चिक मोत्याची माळ’ हे गणपती विशेष गाणे खूप गाजले होते. आजही लोक हे गाणे आवडीने ऐकतात. चिमुरडीमुळे ‘अशी चिक मोत्याची माळ’ गाणे पुन्हा ट्रेंडिंगमध्ये आलेय, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.