अदृश्य सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली, आता या दिवशी होणार रिलीज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

येत्या 13 मे रोजी धर्मवीर मु.पोस्ट. ठाणे व अदृश्य हे दोन चित्रपट रिलीज होणार होते. मात्र दोन मोठे मराठी चित्रपट एकाच दिवशी रिलीज होऊ नये म्हणून अदृश्य या चित्रपटाच्या निर्मात्यांनी त्यांची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली आहे. आता अदृश्य हा सिनेमा 20 मे रोजी प्रदर्शित होणार आहे.

अदृश्य या चित्रपटात मंजिरी फडणीस , पुष्कर जोग हे मुख्य भूमिकेत दिसणार असून त्यांच्यासोबत अनंत जोग, उषा नाडकर्णी, अजय कुमार सिंग यांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटात एका महत्वपूर्ण भूमिकेत रितेश देशमुखही झळकणार आहे. कबीर लाल यांनी दिग्दर्शनासोबत स्क्रीन प्लेची देखील जबाबदारी पार पाडली आहे. साहिद लाल यांनी या चित्रपटाच्या सिनेमॅट्रोग्राफीची धुरा सांभाळली आहे , लवली वर्ल्ड एंटरटेनमेंट या बॅनर खाली चित्रपटाची निर्मिती अजय कुमार सिंह यांनी केली आहे.