
भाजपमधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश करणारे अद्वय हिरे यांची आज शिवसेना उपनेते पदी नियुक्ती करण्यात आली. शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी याबाबत ट्विट केले आहे.
तडफदार अद्वय हिरे यांची आज शिवसेना उपनेते पदी
पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने नियुक्ती करण्यात आली. अद्वय यांचे संघटन कौशल्य शिवसेना वाढीसाठी नक्कीच फायद्याचे ठरेल.
नव्या जबाबदारी बद्दल त्यांचे अभिनंदन!
जय महाराष्ट्र@advay007@OfficeofUT @AUThackeray pic.twitter.com/c1Iw2E6heY— Sanjay Raut (@rautsanjay61) March 9, 2023
”तडफदार अद्वय हिरे यांची आज शिवसेना उपनेते पदी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने नियुक्ती करण्यात आली. अद्वय यांचे संघटन कौशल्य शिवसेना वाढीसाठी नक्कीच फायद्याचे ठरेल. नव्या जबाबदारी बद्दल त्यांचे अभिनंदन! जय महाराष्ट्र” असे संजय राऊत यांनी ट्विट केले आहे.
अद्वय हिरे यांनी 27 जानेवारीला भाजपला रामराम करत आज दादर येथील शिवसेना भवनात उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन हाती बांधले.



























































