
आगामी टी-20 वर्ल्ड कपसाठी दक्षिण आफ्रिकेने 15 सदस्यीय संघ जाहीर केला असून प्रोटियाज संघाचे नेतृत्व एडन मार्करमच्या हाती सोपवण्यात आले आहे. दोन वर्षांपूर्वी हुकलेले जगज्जेतेपद मिळवणे, हेच दक्षिण आफ्रिकन संघाचे ध्येय असेल.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती मागे घेतलेला क्विंटन डी कॉक आफ्रिकन संघात परतला आहे, तर वेगवान गोलंदाज एनरिक नॉर्किया दुखापतीतून सावरून संघात सामील झाला आहे. विशेष म्हणजे, युवा वेगवान गोलंदाज क्वेना मफाका आणि टॉप-ऑर्डर फलंदाज जेसन स्मिथ यांना संधी देण्यात आली असून रायन रिकल्टन आणि ट्रिस्टन स्टब्स यांना मात्र संघाबाहेर ठेवण्यात आले आहे. फलंदाजीत मार्करम, डी कॉक, टोनी डी झोरजी, डेवाल्ड ब्रेविस आणि अनुभवी डेविड मिलर यांची भक्कम फळी उभी आहे.
टी-20 विश्वचषकासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ- एडन मार्करम (कर्णधार), क्विंटन डी कॉक, टोनी डी जोरजी, डेवाल्ड ब्रेविस, डेविड मिलर, डोनोवन फरेरा, माकाx यानसेन, केशव महाराज, पॅगिसो रबाडा, क्वेना मफाका, लुंगी एनगिडी, जेसन स्मिथ, जॉर्ज लिंडे, कॉर्बिन बॉश, एनरिक नॉर्किया.































































