
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याचा गुरुवारी (5 मार्च) मोठ्या थाटामाटात विवाहसोहळा पार पडला. सानिया चंडोक सोबत त्याचे लग्न झाले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह प्रत्येक क्षेत्रातील प्रतिष्ठीत व्यक्ती या विवाह सोहळ्याला उपस्थित होते. लग्न पार पडलं आणि अर्जुन तेंडुलकर पुढील 24 तासांत मैदानात उतरला. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
डीवाय पाटील टी20 चषक 2026 मध्ये अर्जुन तेंडुलकर डीवाय पाटील ब्लू संघाचे प्रतिनिधीत्व करत आहे. गुरुवारी लग्न झालं आणि शुक्रवारी डीवाय पाटील ब्लु संघाची सेमी फायनल मुंबई कस्टमविरुद्ध पार पडली. या सामन्यात अर्जुन तेंडुलकरने फलंदाजी आणि गोलंदाजी केली मात्र, त्याचा संघ या सामन्यात पराभूत झाला. मुंबई कस्टमने डीवाय पाटील ब्लू संघाचा पाच विकेटने पराभव केला. तसेच अर्जुन तेंडुलकरही या सामन्यात फार चकमदार कामगिरी करू शकला नाही. त्याने फलंदाजी करताना 14 चेंडूंमध्ये फक्त 9 धावा केल्या आणि 1 षटक टाकत 20 धावा खर्च केल्या. विशेष म्हणजे लग्नाच्या एक दिवस आधीही अर्जुन आपल्या संघासाठी मैदानात उतरला होता.
अर्जुन तेंदुलकर की शादी कल हुई और आज मैदान में मैच खेल रहे हैं।
सलाम इस जुनून को pic.twitter.com/1FUxgaGVFK
— Ocean Jain (@ocjain4) March 6, 2026


























































