
उपराष्ट्रपती पदावरून अचानक राजीनामा दिल्यानंतर जगदीप धनखड कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात दिसले नाहीत. दरम्यान, राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांनी एक्स वर देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना त्यांच्याबद्दल एक मोठा प्रश्न विचारला आहे. त्यांनी विचारले आहे की, जगदीप धनखड कुठे आहे? याची आम्हाला माहिती हवी. त्यांनी एक्स वर पोस्ट करून विचारले की, “ते सुरक्षित आहे का? त्याच्याशी संपर्क का साधला जात नाही?”
ते म्हणाले की, “गृहमंत्रालयाला याचि नक्कीच माहिती असेल. म्हणून अमित शहांनी याबद्दल माहित द्यावी. अन्यथा, धनखड यांचा शोध घेण्यासाठी आम्हाला सर्वोच्च न्यायालयात हेबियस कॉर्पस याचिका दाखल करावी लागेल.” दरम्यान, 21 जुलै रोजी जगदीप धनखड यांनी आरोग्याच्या कारणास्तव अचानक उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला होता. धनखड यांचा कार्यकाळ ऑगस्ट 2027 मध्ये संपणार होता. मात्र त्यांनी याआधीच राजीनामा दिला.