
सामना प्रतिनिधी । कासार सिरसी
निलंगा तालुक्यातील सरवडी येथील संजय पाटील यांना अज्ञात व्यक्तीने फोन करून एटीएम अॅक्टिवेट करून देतो तुमच्या मोबाइल वर आलेला ओटीपी क्रमांक सांगा, असे सांगून त्याच्या खात्यावरील ४ लाख ४८ हजार २८७ रुपये काढून घेतल्याची घटना घडली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, निलंगा तालुक्यातील सरवडी (प) येथील रहिवाशी संजय त्र्यंबक पाटील वय ४२ वर्ष यांना अज्ञात व्यक्तीने भारतीय स्टेट बँकेच्या नावाचा कॉल करून क्रेडिट कार्ड अॅक्टिवेट करून देतो म्हणून मोबाइलवर आलेले एसएमएस ओटीपी क्रमांक विचारून घेऊन पाटील यांच्या क्रेडिट मधील ४ लाख ४८ हजार २८७ रुपये ऑनलाइन द्वारे काढून फ्लिपकार्ट इन पेमेंट , अमेझोन सेल्स सर्व्हिस इन द्वारे ऑनलाइन खरेदी करून पाटील यांची फसवणूक केली.
याप्रकरणी संजय पाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक दीपक शिंदे हे करीत आहेत.


































































