
बाजारात टोमॅटो खरेदी करणे कठीण झालेले असतानाच आता आलेही आवाक्याबाहेर गेले आहे. टोमॅटो आणि आले यांच्या किमती प्रचंड वाढल्याने गृहिणींचे बजेट पुन्हा एकदा कोलमडले आहे. 60 ते 80 रुपये प्रतिकिलो मिळणारे आले आता थेट 300 ते 400 रुपये किलोपर्यंत गेले आहे. अजूनही टोमॅटोचे भाव शंभरीपर्यंत आहेत. टोमॅटोच्या किमतीमुळे बजेट कोलमडले असतानाच आता आल्याच्या किमतीत मोठी वाढ झाल्याने गृहिणींना महागाईचा ‘अलर्ट’ मिळाला आहे. बाजारात टोमॅटोचे भाव अव्वाच्या सवा वाढले आहेत. किमती पाहून अनेकांनी टोमॅटो खायचे सोडून दिले आहे. तर अनेकांनी टोमॅटोचा दररोजच्या आहारातील वापर कमी केला आहे. टोमॅटोच्या किमती थोडय़ा कमी झाल्या असल्या तरी या किंमतीने अद्याप शंभरी ओलांडलेली आहे. टोमॅटो नंतर आता आलं प्रचंड महाग झाले आहे. किरकोळ बाजारात एक किलो आलं साठी 300 रुपये मोजावे लागत आहे. तर चांगल्या प्रतीच्या आलं साठी 400 रुपयांपर्यंत पैसे मोजावे लागत आहेत.

























































