शनिवारी गोरेगावात ‘अफझलखान वध’

प्रबोधन गोरेगावतर्फे ‘गोष्ट इथे संपत नाही…’ या मालिकेअंतर्गत ‘अफजलखान वध’ ही प्रतापगडाच्या पायथ्याशी घडलेली शिवप्रतापाची रोमांचकारी घटना अनुभवण्याची संधी मिळणार आहे. शनिवार, 19 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजता गोरेगाव पश्चिम सिद्धार्थ नगर येथील प्रबोधन क्रीडा भवन येथे समीर हंपी आणि सत्यजित धांडेकर निर्मित हा कार्यक्रम होणार आहे. अंगावर रोमांच उभे करणारे आणि थेट शिवकाळात घेऊन जाणारे सादरीकरण सारंग भोईरकर आणि सारंग मांडके हे कलाकार करणार आहेत. या कायर्कमासाठी सर्वांना प्रवेश विनामूल्य आहे, अशी माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे.