
फेब्रुवारी महिन्यात हिंदुस्थानी हवाई दलाने बालाकोटमध्ये एअर स्ट्राईक करून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले होते. आता आठ महिन्यांतर दहशतवाद्यांचे तळ पुन्हा सक्रिय झाले आहेत. तिथे 40-50 दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जात असल्याची माहिती एका गुप्तचर यंत्रणेचा अहवालातून मिळाली आहे.
Government Sources: 45-50 terrorists including suicide bombers training at Jaish-e-Mohammed terrorist facility in Balakot (Pakistan) pic.twitter.com/xT8SBWUN6d
— ANI (@ANI) October 14, 2019
एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे. बालाकोटमध्ये दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. यातील अनेक दहशतवाद्यांन आत्मघातकी बॉम्बस्फोटाचेही प्रशिक्षण दिले जात आहे. काही दशतवाद्यांना कश्मीरमध्येही पाठवण्यात आले आहे. सर्व दहशतवादी तळावर सुरक्षा दल लक्ष ठेवून आहे. एअरस्ट्राईकनंतर सहा महिने बालाकोटमध्ये काहीच हालचाली दिसल्या नव्हत्या. परंतु गेल्या महिन्यात बालाकोटलमधील दहशतवादी पुन्ह्या सक्रिय झाल्याची माहिती लष्कर प्रमुख जनरल रावत यांनी दिली होती.






















































