धुळ्यातील साक्री तालुक्यात मंत्री दादा भुसे यांच्याविरोधात शेतकरी आक्रमक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मंत्री दादा भुसे यांच्या धुळे दौऱ्यावेळी शेतकरी आक्रमक झाले होते. भुसे यांच्या या दौऱ्यावेळी शेतकऱ्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवले. साक्री तालुक्यातील कासारे गावात भुसे एका कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी आले असताना शेतकऱ्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवले. शेतकऱ्यांनी भुसे यांच्याविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.

राज्यात सरकार स्थापनेनंतर शेतकऱ्यांना अजूनही मदत मिळालेली नाही. कांद्यासह विविध शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. साक्री तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीने पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र, अद्यापही त्याचे पंचनामे करण्यात आलेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई किंवा कोणत्याही प्रकारची मदत मिळालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष आहे. शेतकऱ्यांच्या या परिस्थितीला दादा भुसे आणि शिंदे सरकार जबाबदार असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. त्यामुळे दादा भुसे यांच्या दौऱ्यावेळी शेतकऱ्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवत रोष व्यक्त केला आहे. टीव्ही 9 या वृत्तवाहिनीने याबाबतचे वृत्त दिले आहे.