
सामना प्रतिनिधी । परळी वैजनाथ
रविवार पासून मराठा क्रांती मोर्चाने रोखठोक आंदोलन सुरू केले आहे. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अमित घाडगे, देवराव लुगडे यांच्यासह समाजबांधव परळी तहसील समोरील प्रांगणात आमरण उपोषणास बसले आहेत. हे उपोषण आज चौथ्या दिवशीही सुरूच आहे. आंदोलनाला पाठिंब्यासाठी परळी तालुक्यातील वानटाकळी येथील समाजबांधवांनी निवेदन दिले.
सरकाने दिलेल्या कालमर्यादेत एकही मागणी पूर्ण न झाल्याने परळीत तहसील कार्यालयासमोर रविवार 25 नोव्हेंबर पासून अमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी विविध गावातील मराठा समाजबांधव साखळी उपोषण करत आहेत. या आंदोलनाचा एक भाग म्हणून आज दि. 28 बुधवार रोजी वानटाकळी येथील समाजबांधवांनी या आंदोलनात सहभागी होऊन सरकार बद्दल तीव्र निषेध व्यक्त केला.


























































