दुधाला उकळी! आंदोलन पेटले, रस्त्यांवर दूध ओतले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, पुणे

दुधाला प्रतिलिटर पाच रुपयांचे अनुदान थेट शेतकऱयांच्या खात्यात जमा करण्यात यावे, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मध्यरात्रीपासून सुरू केलेले आंदोलन तापू लागले आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, नगरसह पश्चिम महाराष्ट्रात ठिकठिकाणी आंदोलकांनी दुधाचे टँकर अडवून दूध रस्त्यावर सोडून दिले. दूध उत्पादक संघांनी दूध संकलन बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दिला. तर कोल्हापूरमधून ‘गोकुळ’चे १२ टँकर पोलीस बंदोबस्तात मुंबईकडे रवाना करण्यात आले. दरम्यान, शेतकऱयांच्या खात्यावर पैसे जमा होणार नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.

दुधात दूध किती आणि पाणी किती?

ओतल्या जाणाऱया दुधात दूध किती आणि पाणी किती हे मला माहीत असते, असे राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी म्हटलेय. असे वक्तव्य करून त्यांनी दूध आंदोलकांची खिल्ली उडवली आहे. ज्या पद्धतीने मी गेली ३० वर्षे आंदोलन करत आलोय, त्यामुळे काय आणि कसे आंदोलन केले जाते हे मला माहीत आहे असे सदाभाऊ म्हणाले. दरम्यान आम्ही शेतकऱयांच्या बाजूने आहोत. मात्र येणारी निवडणूक डोळय़ासमोर ठेवून हे आंदोलन चालले आहे असा आरोपही त्यांनी राजू शेट्टी यांच्यावर केला.

गणपतीबाप्पा, सरकारला सुबुद्धी दे!

दुधाचे दर कोसळल्याने शेतकरी आर्थिक संकटात असतान सरकारने दुधाची भुकटी उद्योगांना मदत जाहीर केली आहे. पाकडर उद्योग हे दरोडेखोर असून त्यांनाच सरकार मदत करत आहे. इतर राज्यांतील सरकारला थेट अनुदान देणे शक्य असताना महाराष्ट्रातच का शक्य होत नाही, असा सवाल करून जोपर्यंत दूध उत्पादक शेतकऱयांच्या बँक खात्याकर प्रतिलिटरमागे ५ रुपये अनुदान जमा होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, खासदार राजू शेट्टी यांनी दिला.  राजू शेट्टी यांनी श्रीमंत दगडूशेठ हलकाई गणपतीला सोमकारी दुग्धाभिषेक केला त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

  • सातारा जिह्यातील वडूज, औंध येथे दूध रस्त्यावर ओतून निषेध करण्यात आला.
  • नगर जिह्यातील बहुतांश दूध संघांनी दूध संकलन बंद केले होते.
  • कराडमध्ये दिवंगत माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला दुग्धाभिषेक करण्यात आला.
  • शिर्डीत साईबाबांच्या प्रतिकात्मक मूर्तीला, तर पारनेरमधील भाळवणीमध्ये हनुमानाच्या मूर्तीला दुग्धाभिषेक करण्यात आला.
  • पोलिसांनी दिवसभरात पाच आंदोलकांना अटक केली.

सोलापूर जिह्यात ठिकठिकाणी रस्त्यावर दूध ओतून निषेध केला. माढा तालुक्यातील रिधोरे येथे टेम्पोतून वाहतूक होणाऱया दुधाच्या पिशव्या रस्त्यावर फेकून देण्यात आल्या, तर अक्कलकोटमध्ये रास्ता रोको आंदोलन करून मोफत दुधवाटप करण्यात आले. पंढरपूर तालुक्यातील सुमारे ११० प्राथमिक दूध सोसायटय़ांनी दूध संकलन बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

पुण्यात पाच गाडय़ा फोडल्या

पुणे येथे स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी दुधाच्या पाच गाडय़ा फोडल्या. क्रांती, माऊली, कृष्णाई, मातोश्री, सोनई दूध संघाच्या गाडय़ा फोडत दूध रस्त्यावर ओतून दिले.