माहितीचा अधिकार डावलला: रावजी यादव यांचे उपोषण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । सिंधुदुर्गनगरी

सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षण विभागात माहिती अधिकारात मागितलेली माहिती देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने याविरोधात महाराष्ट्र राज्य काट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ अतिरिक्त महासचिव रावजी यादव हे जिल्हा परिषद प्रवेशद्वार समोर उपोषणास बसले आहेत.

केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत यादव यांनी प्राथमिक शिक्षण विभागाकडे ३ नोव्हेंबर २०१८ रोजी शुल्क भरून माहिती मागितली होती. मात्र, महिना उलटला तरी जनमाहिती अधिकारी यांनी हि माहिती दिलेली नाही. याबाबत माहिती मिळावी यासाठी त्यांनी या कालावधीत चार वेळा जनमाहिती अधिकारी यांची भेट घेतली. तरीही माहिती न मिळाल्याने उपोषणाचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर केलेले आहे.