अभियंत्याच्या खुर्चीला चप्पलांचा हार घालून संभाजी सेनेचा निषेध

942

मातोळा ते किल्लारी रोडचे काम निकृष्ट केल्याच्या निषेधार्थ संभाजी सेनेच्या वतीने औसा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंता कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले. त्यानंतर अभियंत्यांच्या खुर्चीला चक्क चप्पलांचा हार घालून निषेध करण्यात आला.

निलंगा नगर परिषदचे चालू असलेले पाईपलाईनचे काम विजय कन्स्ट्रक्शन मार्फत करण्यात येत आहे. या कन्स्ट्रक्शनने मातोळा ते किल्लारी या रोडलगतच्या हजारो झाडाची विनापरवाना कत्तल केली आहे. या झाडांची विक्रीही केली आहे. अनेक ठिकाणी रस्ता खोदून पाईपलाईन केल्यामुळे  डांबरी रस्त्याची साईडपट्टी उद्ध्वस्त झाली आहे. यामुळे रस्त्यावर माती पूर्णपणे पडली असल्यामुळे शेकडो वाहने घसरून अपघात होत आहेत. संबंधित कन्स्ट्रक्शन कंपनीला सांगूनही तिकडे कानाडोळा होत असल्याने आणि बांधकाम विभाग याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत असल्याने संभाजी सेनेच्या  वतीने 16/5/2019 रोजी दोषी अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करावे या मागणीचे निवेदन दिले होते. त्यानंतर तोंडी लेखी बर्‍याच तक्रारी दिल्या गेल्या. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी या निवेदनाची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे गुरूवारी संघटनेच्यावतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले परंतु या आंदोलनाची दखल घेण्यासाठी कोणताही अधिकारी उपस्थित नसल्यामुळे संभाजी सेनेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी उप अभियंत्यांच्या खुर्चीला चप्पलांचा  हार घालून त्याचा निषेध केला. या आंदोलनासाठी संभाजी सेनेचे जिल्हाध्यक्ष धर्मराज पवार, धाडस संघटनेचे अध्यक्ष अनिल कोळी, संभाजी सेनेचे तालुकाध्यक्ष  मनोज गरड, ओम बोडके, नारायण गुंजले, निलेश जाधव, प्रध्दुन शिंदे, गोविंद लंजारे, राम कदम, सुखदेव भुजबळ, वैजनाथ सुर्यवंशी व संभाजी सेनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या