आग्रा – शिवमंदिराचं छप्पर कोसळलं, दोन जण मृत्युमुखी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशच्या आग्रा येथील शिवमंदिराचं छप्पर कोसळून दोन जण मृत्युमुखी पडले आहेत. उत्तर हिंदुस्थानात श्रावण सुरू असल्याने श्रावणी सोमवार निमित्त भाविकांनी शिवमंदिरात गर्दी केली होती. अचानक झालेल्या या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला.

आग्रा येथील शाहगंज इथल्या शिवनगर येथे हे शिवमंदिर आहे. या मंदिरात मोठ्या संख्येने भाविक पोहोचले होते. जेव्हा सकाळी लोक पूजा आणि जलाभिषेक करत होते, तेव्हाच मंदिराचं छप्पर कोसळलं. अचानक झालेल्या या दुर्घटनेमुळे मंदिरात गोंधळ उडाला. कोसळलेल्या छपराखाली एक डझनाहून अधिक लोक दबले गेले. त्यात दोन जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एका मुलीचाही समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंदिरावर बनलेल्या घरात एक कुटुंब राहतं. मंदिरही जुनं आहे. त्यामुळे आतापर्यंत 12 जण ढिगाऱ्याखालून बाहेर निघाले असले तरी अजूनही काही जण त्यात दबलेले असल्याची शक्यता आहे.