2022 या वर्षातील पहिला IPOआला; 3 तासातच झाला फुल सबस्क्राइब

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या वर्षात अनेक आयपीओने गुतंवणूकदारांना मालमाल केले. त्यामुळे 2022 या वर्षात येणाऱ्या आय़पीओची गुतंवणूकदारांना उत्सुकता होती. आता 2022 यावर्षातील पहिला आयपीओ आला आहे. या आयपीओमध्ये 19 जानेवारी ते 21 जानेवारी या काळात गुतंवणूक करता येणार आहे. एजीएस ट्रांजैक्ट टेक्नोलॉजीसचा आईपीओ गुतंवणुकीसाठी बुधवारपासून सुरू झाला आहे.

या आयपीओमध्ये प्रतिशेअरसाठी 166-175 रुपये शेअर प्राइज ठेवण्यात आली आहे. तर एका लॉटमध्ये 85 शेअर असणार आहेत. म्हणजे या आयपीओमध्ये गुतंवणूक करण्यासाठी एका लॉटसाठी गुतंवणूकदारांना 14,875 रुपये खर्च करावे लागणार आहेत. या आयपीओला पहिल्याच दिवशी गुतंवणूकदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून पहिल्या दिवशी 3 तासात म्हणजे 1.30 वाजेपर्यंत रिटेनचा हिस्सा 100 टक्के सबस्क्राइब झाला होता.

सेबीच्या नियमानुसार या आयोपीओमध्ये गुतंवणूकदार जास्तीजास्त 2 लाखांपर्यंतची गुतंवणूक करू शकणार आहेत. म्हणजेच एका गुतंवणूकदाराला जास्तीतजास्त 13 लॉट घेता येणार आहेत. हा शेअर ग्रे मार्केटमध्ये 18 रुपये प्रिमियमवर (GMP) आहे. या आयपीओची शेअर अलॉटमेंट 27 जानेवारीला होणार आहे. तर शेअरची लिस्टिंग 1 फेब्रुवारीला होण्याची शक्यता आहे.

एजीएस ट्रांजैक्ट ही देशातील प्रमुख पेमेंट सॉल्युशन कंपनी आहे. रवी. बी. गोयल आणि विनेहा इंटरप्रायझेस कंपनीचे प्रमोटर आहेत. श्रईलंका, कंबोडिया, सिंगापूर, इंडोनेशिया आणि फिलीपाइन्समध्येही ही कंपनी ऑपरेट करते. तसेच ही कंपनी काही बँकांना एटीएमशी संबंधित सेवाही देते. पेट्रोलपंपावर पीओएस टर्मिनल लावणारी ही देशातील मोठी कंपनी आहे.

या आयपीओतून 680 कोटी रुपये जमवण्याचे कंपनीचे उद्दीष्ट आहे. आयपीओमध्ये रिटेल गुतंवणूकदारांसाठी 35 टक्के भाग राखीव ठेवण्यात आला आहे. कंपनीकडे एकूण 2,21,066 मर्चेट पीओएस, 17,924 पेट्रोल पंपावरील पीओएस, 72,000 एटीएम आणि सीआरएमचे नेटवर्क आहे. कंपनीच्या मोठ्या ग्राहकांमध्ये आयसीआयसीआय, अॅक्सिस आणि एचडीएफसी बँकांचा समावेश आहे.