मनपा निवडणुक : दुसर्‍या दिवशी 310 अर्जाची विक्री

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दुसर्‍या दिवशी 310 अर्जांची विक्री झाली आहे. दुसर्‍या दिवशी कोणत्याही उमेदवारोन अर्ज दाखल केलेले नाही.

महारगपालिकेची निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया कालपासून सुरु झाली आहे. काल एक उमेदवारी अर्ज दाखल होवून 17 ऑनलाईन अर्ज दाखल झाले होते.

आज सकाळपासूनच पुन्हा उमदेवारी अर्ज घेण्यासाठी करण्यासाठी मोठी गर्दी दिसून येत होती. सावेडी प्रभागात 91, माळीवाडा प्रभागात 145, बुरुडगाव प्रभागात 37 आणि केडगाव प्रभागता 37 असे 310 अर्ज नेण्यात आले आहेत. दुसर्‍या दिवशी कोणत्याही उमेदवारोन अर्ज दाखल केलेला नव्हता.

आज सकाळपासूनच ना हरकत दाखला घेण्यासाठी प्रत्येक उमदेवाराच्या प्रतिनिधीची चांगलीच धडपड सुरु होती. सकाळपासूनच उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी मनपाच्या कार्यालयात ये-जा सूरू होती. यंदाच्या निवडणुकीत अनेक ना हरकत दाखले घ्यावयाचे असल्याने मनपात गेल्या पाच सहा दिवसात गर्दीने उच्चांक गाठला आहे. आपल्या नेत्याच्या ना हरकत दाखल्यासाठी कार्यकर्ते आता कादपत्राचीं जुळवा जुळव सुरु करत आहे. दिपावलीच्या काळातही सुट्टी असताना इच्छुकांनी आपले कागदपत्र तयार करुन निवडणुकीचे काम केले.

नगर शहरात मनपा निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी करण्यासाठी तब्बल 267 इच्छुकांनी मुलाखती दिल्या. नगरच्या इतिहासात कधी नव्हे एवढा प्रतिसाद भाजपला मिळाल्याने प्रदेशचे पदाधिकारी व मुख्यमंत्री खुश झाले आहेत.भाजपच्या इच्छुकांची यादी थेट पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांकडे गेली आहे. तिथे उमेदवार निश्‍चित केले आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील व लगेच भाजपची यादी प्रसिध्द करण्यात येईल असे भाजपच्या गोटातूनसांगण्यात आले. त्यानुसार ही सर्व प्रक्रिया सुरू असून आता प्रदेशाध्यक्ष कार्यालयातून ही यादी मुख्यमंत्र्यांकडे गेल्याची माहिती समजली आहे.