अहिल्यानगरमध्ये सरकारची दडपशाही, अमित शहांच्या दौऱ्याआधी शिवसेना-मनसेच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं

देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी आणि कोपरगाव येथे येणार आहेत. तत्पूर्वी सरकारने दडपशाही करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले. यामुळे एकच खळबळ उडाली असून शिवसेनेचे नगर जिल्हा प्रमुख किरण काळे यांनी सरकारच्या दडपशाहीचा तीव्र निषेध केला.

राजकीय विरोधकांवर असा दडपशाही करणे लोकशाहीच्या मुलभूत मूल्यांचा उपहास आहे. प्रशासनाने आणि पोलीस यंत्रणेतून हे अत्याचार केल्यास याचे गंभीर परिणाम होतील, असा इशारा किरण काळे यांनी दिला.

भयग्रस्त राज्यकर्त्यांना देशावर राज्य करण्याचा अधिकार नाही! शहांच्या दौऱ्याआधी नगरमध्ये शिवसैनिकांची धरपकड; संजय राऊत संतापले