नगर जिल्ह्यात 1003 जनावरांना लम्पीची बाधा, 9 लाख जनावरांचे होणार लसीकरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर जिल्ह्यात लम्पीबाधित जनावरांचा आकडा आता 1003 वर पोहोचला आहे. यातील 394 जनावरांनी लम्पीवर मात केली असली तरी दैनंदिन बाधित होणाऱया जनावरांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. यामुळे बाधित जनावरे सापडलेल्या भागाच्या पाच कि.मी. परिघातील 9 लाख 31 हजार जनावरांचे लसीकरण करावे लागणार आहे, अशी माहिती पशुसंवर्धन विभागाला दिली.

नगर जिह्यात गाई आणि म्हशींची संख्या जवळपास 16 लाख आहे. यातील सध्या 9 लाख 31 हजार जनावरांना लम्पी संसर्गाचा धोका असल्याने त्यांचे तातडीने लसीकरण करण्यात येणार आहे. लम्पी बाधित जनावरांची संख्येने एक हजारांचा टप्पा ओलांडला आहे. दरम्यान, जिह्यात लम्पीमुळे 35 जनावरांचा बळी घेतलेला आहे. जिह्यात 157 गावांत लम्पी संसर्गाची जनावरे आढळली असून, या गावाच्या पाच कि.मी.च्या टप्प्यात 824 गावे आहेत.