
दरोड्याच्या तयारीत असलेल्या गुन्हेगारांचा छडा कोतवाली पोलिसांनी लावला आहे. शहराच्या मध्यवर्ती असलेल्या माळीवाडा बस स्टन्ड परिसरात एका पांढऱ्या रंगाच्या इंडिका कारमध्ये काही जण दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
कोतवाली पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून मोठ्या शिताफीने पकडून संबंधित आरोपींकडून साहित्य साधनासह, एक लोखंडी तलवार, तीन लाकडी दांडके व एक लोखंडी कटावणी गावठी बनावटीचे पिस्तुल आधी मुद्देमाल हस्तगत करून पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान आरोपींना 12 तारखेपर्यंत पोलीस कोठडी याचे आदेश न्यायालयाने दिले.
आरोपींमध्ये प्रविण संजय गंगावणे (वय 25 वर्ष रा. गुरवपिंप्री ता. कर्जत जि. नगर), मुकेश शंकर सावंत (वय 34 वर्ष रा. सांगवी आष्टी ता.आष्टी जि.बीड), सुनिल ललीत थापा (वय 57 वर्ष मुळ रा. भांडुप मुंबई हल्ली रा. घोगरगाव ता. श्रीगोंदा जि. नगर), सुनिल कैलास खरमाटे (वय 35 वर्ष रा. पिंपळगाव टप्पा ता. पाथर्डी जि. नगर), शंकर हिरामण शिरसाठ (वय 22 वर्ष रा. पिंपळगाव टप्पा ता.पाथर्डी जि. नगर) यांचा समावेश आहे.
कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पोलीस गस्त घालत असतानाच कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांना परिसरामध्ये काहीजण चारचाकी गाडीतून माळवाडी च्या दिशेने येत असल्याची माहिती मिळाली होती यावरून त्यांनी तत्काळ विशेष पथकाला या ठिकाणी पाठवून त्यांच्यावर कारवाईच्या सूचना दिल्या होत्या.
संबंधित पोलिसांचे पथक त्या भागांमध्ये गेले असता एका पांढऱ्या गाडीमध्ये चार ते पाच जण होते संबंधित गाडी माळीवाडा परिसरामध्ये आल्यानंतर तेथे काही जणांच्या हालचाली दिसून आल्या. पोलिसांनी त्यांना हटकले त्यांची धांदल उडाली व ते पळून जाण्याच्या तयारीत असताना कोतवाली पोलिसांनी त्यांना मोठ्या शिताफीने पकडले व त्यांच्याकडे त्यांनी विचारपूस केली, तसेच त्या गाडीची झाडाझडती घेतल्यानंतर त्यांच्या गाडीमध्ये तलवारी, वॉकी टॉकी, इतर साहित्य आढळून आले.
पोलिसांनी तत्काळ सदरची गाडीही जप्त करून त्यांना तात्काळ कोतवाली पोलिस ठाण्यांमध्ये आरोपीना आणले व त्यांच्याकडे विचारणा केल्यानंतर त्यांच्या ताब्यातून एक गावठी पिस्तूल तसेच तीन जिवंत काडतुसे पोलिसांनी हस्तगत केले आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्याचे सागर भानुदास पालवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदरची कारवाई कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे, पो.उप. निरीशक मनोज कचरे, भिंगारदिवे, नितीन शिदे, दिपक रोहकले, तानाजी पवार, सुजय हिवाळे, शरद गायकवाड, भारत इंगळे यांच्या पथकाने केली आहे. आरोपी मुकेश सावंत याच्यावर विविध पोलीस ठाण्यात 12 गुन्हे दाखल आहेत.तर इतर आरोपींनी वर सुद्धा चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
पोलिसांनी जेव्हा आरोपींची झाडाझडती घेतली, त्या वेळेला गावठी कट्टा व जिवंत काडतुसे याच या बरोबरच पोलिसांचा खाकी ड्रेस तसेच वॉकी टॉकी त्यांच्या कबज्यातून हस्तगत केले आहे. बहुदा पोलीस असल्याचे भासवून एखाद्या ठिकाणी जात असावेत, असा संशय पोलिसांना आला असून त्या दृष्टिकोनातून त्यांची चौकशी सुरू केली असल्याचेही पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांनी सांगितले. त्यांच्याकडून आणखी गुन्हे सुद्धा उघड होण्याची शक्यता आहे असे ते म्हणाले.
























































