नगर जिल्ह्यात दिवसभरात 10 नवीन कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण, 57 जणांचे अहवाल निगेटिव्ह

593

नगर जिल्ह्यात दिवसभरात जिल्ह्यात कोरोनाचे 10 नवीन रुग्ण आढळले तर 57 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण नोंद रुग्ण संख्या 41 वर पोहोचली आहे. जिल्ह्यात सध्या 59 ऍक्टिव्ह केस आहेत.

कर्जत तालुक्यातील राशीन येथील एकाच कुटुंबातील 12 वर्षीय मुलगा आणि 17 वर्षीय मुलगी असे 2 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. राहाता तालुक्यातील ममदापूर बाभळेश्वर येथील 35 वर्षीय पुरुष, संगमनेर तालुक्यातील 5, पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथे मुंबईहून आलेली 36 वर्षीय महिला आणि नगर शहरातील केडगांव येथील मुंबई येथे कामाला असलेली 28 वर्षीय महिला सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहे.

दरम्यान, आजीसह मुंबईहून कर्जत तालुक्यातील राशीन येथे आलेली सहा वर्षीय मुलगी कोरोनाचा लढा यशस्वीपणे लढून आणि त्याच्यावर मात करुन सुखरुप घरी परतली आहे. आज नगर येथील बूथ हॉस्पिटल येथुन या मुलीला डिस्चार्ज देण्यात आला असुन संगमनेर तालुक्यातील निमोण येथील एका व्यक्तीला आज नाशिक येथून डिस्चार्ज देण्यात आला.

आपली प्रतिक्रिया द्या