
पाऊस लांबला जरी असला तरी नगर जिल्हा प्रशासनाने सर्व ती तयारी केली असून टॅंकरने काही ठिकाणी पाणीपुरवठा सुद्धा सुरू केला असल्याची माहिती जिल्हाधिकारी सिताराम सालीमठ यांनी दिली. नगर जिल्ह्याचा विकास आराखडा तयार करण्याचे काम हे अंतिम टप्प्यात आले असून लवकरच तो तयार केला जाईल, जलजीवन मिशनच्या संदर्भात झालेल्या घोटाळ्याची चौकशी करता शासन स्तरावरून काय निर्णय घेतो ते पाहून पुढील निर्णय घेतला जाईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आयोजित केलेल्या बैठकीमध्ये ते बोलत होते.
जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले की, पाऊस लांबला आहे असे असताना देखील सुद्धा कोणत्याही प्रकारे नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची खबरदारी घेतली जाणार आहे. जिल्हा प्रशासनाने पिण्याच्या पाण्याच्या टँकर साठी त्यांचे निविदा मंजूर केली असून काही ठिकाणी टँकर सुद्धा सुरू केल्या असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. नगर जिल्ह्यामध्ये सध्या तरी पाण्याची कमतरता नाही व पाणी कपात त करण्याचा काही प्रश्नच नाही असे त्यांनी सांगितले. जनावरांसाठी चाऱ्याचा जो काही विषय होता त्यासाठी सुद्धा संबंधित कृषी विभागाला सूचना देऊन त्याची योग्य पद्धतीने अंबलबजावणी करण्याच्या संदर्भात सुद्धा सूचना दिल्या असल्यास ही त्यांनी सांगितले. ऑगस्टच्या महिन्यामध्ये टंचाई आराखडा सुद्धा तयार केला जाईल असेही ते म्हणाले.
नगर जिल्ह्यामध्ये विकास होण्याच्या दृष्टिकोनातून नव्याने आता विकास आराखडा हा तयार केला जाणार आहे, त्याचे काम अंतिम टप्प्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक विभागाचा यामध्ये समावेश आम्ही करणार असल्याचेही ते म्हणाले तसेच यामध्ये काही सुविधा उपलब्ध करून देता येतील का व नव्याने काही प्रकल्प आणता येतील का त्याचा सुद्धा विचार करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. नगर जिल्ह्यामध्ये औद्योगिक करण्याच्या संदर्भात सुद्धा आता वेगळ्या पद्धतीने विचार सुरू करणार असल्याचेही सुतवाची जिल्हाधिकारी सालीमठ यांनी केले. जिल्ह्याचा विकास करताना प्रत्येक गोष्टीची खबरदारी घेण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले तसेच सर्व खात्यांच्याकडून एकत्रित माहिती गोळा झाल्यानंतरच अधिक उपायोजना कशा पद्धतीने केले हे दिसून येईल असे ते म्हणाले.
औद्योगिक विकासाबरोबरच शेतीचा सुद्ध विषय महत्त्वाचा आहे, त्या दृष्टिकोनातून शेती महामंडळाच्या जागा आहेत त्या ठिकाणी आम्हाला आता आयटी पार्क सारख्या काही उपयुक्त अशा गोष्टी कराव्या लागणार आहे, त्याचा सुद्धा विचार केला जाणार आहे, शेती उत्पन्न वाढावे व तसेच शेतकऱ्यांच्या संदर्भात अनेक विषयांवर या आराखड्यामध्ये सुद्धा समावेश केला जाणार असल्याची त्यांनी सांगितले. नगर जिल्हा हा जरी काही भागात दुष्काळी पट्टा असला तरी तेथील भौगोलिक परिस्थितीच्या संदर्भात सुद्धा विचार करून या आराखड्यामध्ये तेथील विकासासंदर्भातला सुद्धा विषय घेतला जाईल असेही ते म्हणाले. शेतीमालाला चांगला भाव मिळावा तसेच निर्यात सुद्धा चांगल्या पद्धतीने व्हावी या उद्देशाने सुद्धा या आराखड्यामध्ये निश्चितपणे समावेश करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. औद्योगिकरण व पर्यटन या दोन गोष्टीवर अधिक अधिक भर देण्याचा मानस असल्याचेही ते म्हणाले आराखडा निश्चित झाल्यानंतर असतो कितीचा झालेला आहे हे समजून घेईल असे जिल्हाधिकारी म्हणाले. नगर जिल्ह्यातील जल जीवन मिशनच्या घोटाळ्याच्या संदर्भामध्ये तक्रारी आलेल्या होत्या, त्या संदर्भात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे ते प्रकरण पाठवण्यात आले असून त्यांनी शासनाकडे या संदर्भातील काही माहिती मागवलेली आहे ती आल्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल असेही जिल्हाधिकारी सालीमठ यांनी सांगितले.
एखाद्याला मालाची नोंदणी झाल्यावर त्याला एक्सपोर्ट परवानगीसाठी पुणे या ठिकाणी जावे लागत होते, आता लवकरच नगर जिल्ह्यामध्ये एक्सपोर्ट करता केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून या महिन्याभरामध्ये त्याची अंमलबजावणी होणार असल्याचेही जिल्हाधिकारी सालीमठ यांनी सांगितले आहे. शिर्डी या ठिकाणी अद्ययावत असे विमानतळ करण्याच्या संदर्भातला म्हणजेच कार्बोहापचा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितलं.




























































