नगरमध्ये महायुतीच्या उमेदवारांनी भरले उमेदवारी अर्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विधानसभेच्या निवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवारांनी आज मोठे शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. नगर जिल्ह्यामध्ये आज बहुतांश उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. महायुतीच्या वतीने शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी नगरमधून, राहुरीमध्ये भाजपचे शिवाजी कर्डिले, कोपरगाव मध्ये भाजपाच्या स्नेहलता कोल्हे, शेवगाव म्हणून भाजपच्या मोनिका राजळे तर अकोल्यातून भाजपचे वैभव पिचड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यावेळी मोठ्या रॅल्या काढून शिवसेने भाजप महायुतीच्या वतीने शक्तीप्रदर्शन करण्यात आले. सर्वत्र मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे ज्या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करणार त्या परिसरामध्ये 144 कलम लागू केल्यामुळे सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळाला.

शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी नगर शहरामध्ये महायुतीच्या वतीने आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत भाजपाचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, भाजपाचे सदाशिव देवगावकर, माजी महापौर सुरेखा कदम, अनिता ठुबे यांच्यासमवेत उमेदवारी अर्ज दाखल केला