नगर मनपाच्या महापौरपदासाठी शिवसेनेकडून रोहिणी शेंडगे यांचा अर्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
shivsena

नगर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक जाहीर झाली आहे. महापौरपदासाठी शिवसेनेच्या नगरसेविका रोहिणी शेंडगे यांनी महाविकास आघाडीच्या वतीने आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. बुधवारी (दि. 30) ही निवडणूक ऑनलाइन होणार आहे. दरम्यान, राष्ट्रवादीकडून उपमहापौरपदासाठी उद्या अर्ज दाखल करण्यात येणार आहेत.

आज अर्ज दाखल करताना शिवसेनेचे नगर जिल्हा संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर, राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव, युवा सेनेचे जिल्हा युवा अधिकारी विक्रम राठोड, शहरप्रमुख दिलीप सातपुते, राष्ट्रवादीचे गणेश भोसले, विनीत पाऊलबुद्धे, कुमार वाकळे, स्थायी समिती सभापती अविनाश घुले, विरोधी पक्षनेता संपत बारस्कर, माजी महापौर, भगवान फुलसौंदर, सुरेखा कदम, पुष्पा बोरुडे, रिता भाकरे, सुवर्णा जाधव, नगरसेवक अनिल शिंदे, गणेश कवडे, सुभाष लोंढे, मदन आढाव, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, अशोक बडे, योगीराज गाडे, सचिन शिंदे, श्याम नळकांडे, अनिल बोरुडे, बाळासाहेब बोराटे, विजय पठारे, अमोल येवले, प्रशांत गायकवाड, सुरेश तिवारी, दत्ता जाधव, अशोक दहिफळे, संजय शेंडगे, संतोष गेनाप्पा, विद्या खैरे, महिला आघाडीच्या आशा निंबाळकर, अरुणा गोयल, उषा ओझा आदी उपस्थित होते.

नगर महापालिकेच्या महापौरपदाकरिता शिवसेनेच्या रोहिणी शेंडगे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी आज आपले चार अर्ज दाखल केले आहेत. या अर्जावर सूचक म्हणून पुष्पा बोरुडे, तर अनुमोदक म्हणून अनिल शिंदे, दुसऱया अर्जावर सुरेखा कदम सूचक तर गणेश कवडे अनुमोदक आहेत. तिसऱया अर्जावर अशोक बडे हे सूचक असून, विजय पठारे हे अनुमोदक आहेत. चौथ्या अर्जावर सुवर्णा गेनाप्पा या सूचक असून, विद्या खैरे या अनुमोदक आहेत.