श्रीरामपुरात नवविवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दीड वर्षापूर्वी प्रेमविवाह केलेल्या नवविवाहितेने राहत्या घरातील छताला साडी बांधून आत्महत्या केली. श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे ही घटना घडली.

शरयू गौरव चितळे (वय 21) असे मृत विवाहितेचे नाव आहे. शरयू हिचा दीड वर्षापूर्वी टाकळीभान येथील गौरव चितळे यांच्याशी प्रेमविवाह झाला होता. ती पती व सासू-सासरे यांच्यासमवेत राहत होती. गावचा आठवडे बाजारचा दिवस असल्याने पती गौरव याने सकाळीच भाजीपाला आणला होता. सासरे अंडापावची गाडी चालवत असल्याने ते घराबाहेरच होते. तर, सासूही बाहेर गेलेली होती. सकाळी 12 वाजेच्या सुमारास शरयू घरात एकटीच होती. तिने घराच्या छताच्या पंख्याला साडी बांधून आत्महत्या केली.

आत्महत्येनंतर तिला तातडीने श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी ती मयत झाल्याचे सांगितले. घटनेची माहिती मिळताच टाकळीभान दूरक्षेत्राचे हेडकॉन्स्टेबल रवींद्र पवार व सहायक बाबा शेख यांनी घटनास्थळी भेट दिली.