
नगर जिह्यासह शहरामध्ये वाहतुकीला शिस्त लागावी, यासाठी पोलिसांकडून उपाययोजना आखण्यात येतात. मात्र, नगरकरांकडून वाहतुकीचे नियम धाब्यावर बसविल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या वर्षभरात नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल एक लाख 99 हजार 76 वाहनांवर कारवाया करीत त्यांच्या मालक-चालकांना पोलिसांनी 12 कोटी नऊ लाख 11 हजार 800 रुपयांचा दंड केला आहे. वाहतुकीचे नियम मोडण्यात नगरकर नेहमीच अव्वल असल्याचे दिसून येते.
नगर जिह्यात 2021प्रमाणेच 2022मध्येही वाहतुकीचे नियम मोडणाऱयांवर मोठय़ा प्रमाणात दंडात्मक कारवाया करण्यात आल्या. ‘दंड भरू, पण नियम नाही पाळू’ ही मानसिकता नागरिकांची असल्याने पोलिसांचीही डोकेदुखी वाढली आहे. नगर शहरासह जिह्यात वाहतुकीच्या नियमांबाबत नागरिकांमध्ये कमालीची बेशिस्त असल्याचे आढळून येत आहे. नागरिकांना वाहतुकीची शिस्त लागण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून वेळोवेळी उपक्रम राबविण्यात आले आहेत. मात्र, त्याचा कोणताही परिणाम नागरिकांवर झाल्याचे दिसून येत नाही.
वाहन चालविताना सीटबेल्ट न लावणे, दुचाकीवरून ट्रिपलसीट जाणे, मद्य पिऊन वाहन चालविणे, सोबत वाहनाची कागदपत्रे न बाळगणे अशा विविध कारणांसाठी वाहतूक पोलिसांनी 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीत तब्बल दोन लाख कारवायांमध्ये 12 कोटी नऊ लाख 11 हजार 800 रुपये एवढा दंड केला आहे. वाहतुकीच्या नियमांचे पालन होत नसल्याने दंड ठोठाविण्यात येत असला, तरीही बेशिस्तपणा कायम आहे.
केवळ दोन कोटींचीच वसुली
नियम मोडणाऱयांना 12 कोटी नऊ लाख 11 हजार 800 रुपये इतका दंड ठोठाविला असला, तरी त्यापैकी अवघ्या दोन कोटी रुपयांचीच वसुली पोलिसांनी केली आहे. त्यामुळे कारवाया व दंडाची आकडेवारी फुगलेली दिसत असली, तरी दंडवसुलीचे प्रमाण खूप कमी आहे.
वाहतुकीला अडथळाच जास्त
वाहन चालविताना इतर नागरिकांना त्रास होईल वा अपघाताची शक्यता वाढेल अशा स्थितीत वाहने उभी करणाऱया 53 हजार 552 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. वर्षभरात वाहतुकीला अडथळा निर्माण केल्याबाबत सर्वाधिक कारवाया पोलिसांनी केल्या आहेत. नियम मोडणाऱयांना 12 कोटी नऊ लाख 11 हजार 800 रुपये इतका दंड ठोठाविला असला, तरी त्यापैकी अवघ्या दोन कोटी रुपयांचीच वसुली पोलिसांनी केली आहे. त्यामुळे कारवाया व दंडाची आकडेवारी फुगलेली दिसत असली, तरी दंडवसुलीचे प्रमाण खूप कमी आहे.
वाहतुकीला अडथळाच जास्त
वाहन चालविताना इतर नागरिकांना त्रास होईल वा अपघाताची शक्यता वाढेल अशा स्थितीत वाहने उभी करणाऱया 53 हजार 552 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. वर्षभरात वाहतुकीला अडथळा निर्माण केल्याबाबत सर्वाधिक कारवाया पोलिसांनी केल्या आहेत.