नगरमधील उड्डाणपुलाखालील सिग्नल चालू करा, शिवसेनेचे निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर शहरातील उड्डाणपुलाखालून शहरांतर्गत वाहतूक चालते. मात्र, अपुरी पोलीस यंत्रणा व सिग्नलचा अभाव यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. येत्या सात दिवसांत उड्डाणपुलाखाली तसेच शहरातील बंद सिग्नल यंत्रणा सुरू करण्याची मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन निवासी जिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांना देण्यात आले.

यावेळी माजी महापौर भगवान फुलसौंदर, शहरप्रमुख संभाजी कदम, युवा सेना सहसचिव विक्रम राठोड, संजय शेंडगे, दत्ता जाधव, प्रशांत गायकवाड, सचिन शिंदे, संतोष गेन्नप्पा, दत्तात्रय कावरे, गिरीश जाधव, सुरेश क्षीरसागर, गौरव ढोणे, श्याम नळकांडे, श्याम घोलप, प्रा. अंबादास शिंदे, पप्पू भाले, श्याम सोनवणे, जेम्स आल्हाट, संतोष ढमाले, शरद कोके, अरुण झेंडे, गिरीधर हांडे, शिरीष जानवे, अक्षय शेकडे आदींसह मोठय़ा संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, शहरामध्ये प्रथमच उड्डाणपूल बांधण्यात आला आहे. या उड्डाणपुलावरून तसेच पुलाखालून मोठय़ा प्रमाणात वाहतूक चालू आहे. या उड्डाणपुलामुळे नागरिकांची मोठी सोय झाली आहे. मात्र, शहरातील या वाढत्या रहदारीचे नियमन करण्यासाठी कोणतीही यंत्रणा उड्डाणपुलाखाली नाही. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. 20 मे 2022 रोजी व 19 डिसेंबर 2022 यासंदर्भात स्मरणपत्रही दिले होते. त्यावेळी उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू झाल्यानंतर निर्देशित ठिकाणी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित केली जाईल, असे आश्वासन शहर वाहतूक शाखेतर्फे दिले होते.