नगर – डांबर घोटाळ्याप्रकरणी गुन्हे दाखल

470

रस्त्याच्या कामाच्या गुणवत्ता चाचणीचे बनावट अहवाल दस्तऐवज करून सरकारची 46 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी जिल्हा परिषदेचे नोंदणीकृत ठेकेदार यांच्यावर शुक्रवारी (दि. 24) नगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

जुनेद कलीम शेख (रा. श्रीरामपूर) असे गुन्हा दाखल झालेल्या ठेकेदाराचे नाव आहे. याप्रकरणी अर्जुन यादव आंधळे (रा. वसंत टेकडी) कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद यांनी फिर्याद दिली होती. शेख हा जिल्हा परिषदेचा नोंदणीकृत्र ठेकेदार आहे. शेख याने 2005 ते 2017 याकालावधीत वेळोवेळी साहित्य गुणवत्ता चाचणीचे बनावट दस्ताऐवजाचा वापर करून जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाची 46 लाख एक हजार 249 रुपयांची फसवणूक केली आहे.

श्रीरामपूर तालुक्यातील निमगाव खैरी ते उत्तर रस्ता टाकळीभान ते गुंजाळवाडी गोंडेगाव उंदीर गाव खानापुर आता रस्त्यांचा समावेश आहे. ठेकेदार शेख याने केलेल्या फसवणूक प्रकरणी कोतवाली पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक भंगाळे करत आहे.
या प्रभारी कार्यकारी अभियंता डिसेंबर महिन्यांत ठेकेदार शेख यांच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात फसवणुकीची फिर्याद दिली होती. मात्र, आंधळे यांच्या फिर्यादीसोबत कोतवाली पोलीसांना गुन्हा दाखल करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती हवी होती. त्या माहितीसाठी कोतवाली पोलीसांनी जिल्हा परिषदेला वेळोवेळी सुचित करून घोटाळा प्रकरणी आवश्यक कागदपत्र मिळाल्यानंतर शुक्रवारी गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, यापूर्वी जिल्हा परिषद पातळीवर समितीने केलेल्या तपासणीत ठेकेदार शेख यांच्यावर लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. त्यानुसार आधी जिल्हा परिषद प्रशासनाने शेख यांना नोटीस देऊन खुलासा मागविला होता. हा खुलासा अमान्य झाल्यानंतर कायदेशीरपणे कार्यकारी अभियंता आंधळे यांनी ठेकेदार शेख यांच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे डांबर घोटाळा संदर्भातला विषय गेल्या काही महिन्यापासून चांगलाच गाजला होता या प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात दिरंगाई होत असल्याचा चर्चासुद्धा जिल्हा परिषद च्या आवाजामध्ये होत्या मात्र या प्रकरणाची सखोल चौकशी झाल्यानंतर या अहवालामध्ये संबंधित ठेकेदाराचा विषय पुढे येऊन त्याने बनावट दस्तावेज तयार करून एक प्रकारे शासनाची फसवणूक केली आहे असे या अहवालामध्ये नमूद झाले होते त्यानुसार काल या प्रकरणाची कार्यकारी अभियंत्यांनी दिल्यानंतर गुन्हा दाखल झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या