अहमदपूर येथे एका इसमाचा निर्घृण खून

596

अहमदपूर तालुक्यातील थोडगा येथील रहिवासी असलेल्या गौतम कांबळे (45) याचा मृतदेह थोडगा रोड जवळील निजवंते नगरच्या मोकळ्या मैदानात सोमवारी सकाळी अंदाजे 8:30 वाजता आढळून आला. या मृतदेहावर हॉटेल मधील बसण्याच्या लाकडी बाकड्याने डोक्यात असंख्य वार केलेले दिसून येत आहेत.

डोक्याचा पूर्ण चेंदामेंदा झाला असून तो कॉलेज रोड अहमदपूर येथील भागीरथी लॉज मध्ये कामाला होता. त्याची काम संपण्याची वेळ रविवारी रात्री साडे नऊ वाजता संपली होती, असे सांगण्यात येत आहे. अहमदपूर पोलिसांनी घटना स्थळी तत्काळ येऊन पंचनामा केला असुन पुढील तपास अहमदपूर पोलीस करत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या