अहमदपूर येथे प्रार्चायांचे घर फोडले, 371716 रुपयांचा ऐवज पळवला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अहमदपूर येथील महात्मा गांधी महाविद्यालयाचे प्राचार्य श्रीरंग कुंडलीकराव खिल्लारे यांचे घर अज्ञात चोरट्यांनी भर दुपारी फोडले. 371716 रुपयांचा ऐवज पळवण्यात आला आहे. या चोरी प्रकरणी अहमदपूर पोलीस ठाण्यात प्राचार्य श्रीरंग कुंडलीकराव खिल्लारे यांनी तक्रार दाखल केली.

श्रीरंग कुंडलीकराव खिल्लारे कॉलेजला गेलेले होते. त्यांच्या आईची तब्येत ठिक नसल्यामुळे त्यांची पत्नी घराला कुलूप लावून सासूला दवाखान्यात दाखवण्यात घेऊन गेली होती. दवाखान्यातून त्या 2.45 वाजता घरी परत आल्या असता त्यांना घराचा कडी कोंडा तोडलेला दिसला. घराचे दार उघडे पाहून त्यांनी तत्काळ त्याची माहिती फोनवरुन पतीला कळवली. चोरट्यांनी घराच्या दोन्ही बेडरुमधील कपाटे फोडून, आतील लॉकर तोडून 1.4 तोळ्याचे सोन्याचे मिनी गंठण किंमत ३९३२९ रुपये, ६.१ तोळ्याचे सोन्याचे लॉकेट, दोन पेंडल व मनी किंमत 191080 रुपये, 2 तोळ्याचे सोन्याचे मिनीगंठण किंमत 84750 रुपये, 5 ग्रॅमचे एक चक्र व एक अंगठी किंमत 15167 रुपये, 6 ग्रॅमची एक अंगठी किंमत 16730 रुपये, 1.8 तोळ्याचे मिनीगंठण व जोडमनी किंमत 24550 रुपये असा सुमारे 371716 रुपयांचा ऐवज पळवला. अहमदपूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुध्द पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.