‘एआय’मुळे पाच वर्षांत आठ नोकऱ्यांना धोका

एआयमुळे पुढील पाच वर्षांत अनेक नोकऱ्यांना धोका निर्माण होणार असून यात प्रामुख्याने आठ नोकऱ्यांचा समावेश आहे. एचआर विभागातील बऱ्याच नोकऱ्यांवर गंडांतर येणार आहे. एआय एचआरची अनेक कामे करत आहे. सेल्फ ड्रायविंग कारची मागणी वाढत असल्याने अनेक ड्रायव्हरच्या नोकऱ्या जातील. कोडिंग सेक्टरवरसुद्धा एआयचा परिणाम होणार आहे. एआयने एण्ट्री लेवलची कोडिंग केली जात आहे. सिक्योरिटी सेक्टरमध्येही एआयकडून कामे करून घेतली जात आहेत. मोठ्या अधिकाऱ्यांकडे जे पीए म्हणून काम करतात. त्यांच्यापेक्षा जास्त लवकर आणि चांगली कामे एआय करत आहेत. सेल्समध्येही एआयचा चांगला वापर केला जात आहे. रेस्टॉरंटमधील वेटरच्या नोकऱ्याही धोक्यात आहेत.