अण्णाद्रमुकला झटका, तीन आमदार टीव्हीकेमध्ये

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तामीळनाडूमध्ये भाजपचा मित्र पक्ष असलेल्या अण्णाद्रमुकला मोठा झटका बसला आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून महिना उलटत नाही तोच अण्णाद्रमुकच्या तीन आमदारांनी राजीनामा देत थेट विजय यांच्या तामिळगा वेट्री कळघम पक्षात प्रवेश केला आहे. विधानसभा अध्यक्षांनी तिन्ही आमदारांचे राजीनामे स्वीकारले आहेत.

निकाल लागल्यानंतरच टीव्हीकेला पाठिंबा देण्यावरून अण्णाद्रमुकमध्ये गट पडले होते. या पक्षातील एस.पी. वेलुमणी गट विजय यांना पाठिंबा देण्यासाठी आग्रही होता. मात्र पक्षाने कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे नाराज झालेल्या एम. कुमारावेल, एस. जयकुमार आणि पी. सत्यभामा यांनी विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी टीव्हीकेच्या बाजूने मतदान केले होते. आता त्यांनी थेट आमदारकीचा राजीनामा देऊन टीव्हीकेमध्ये प्रवेश केला आहे. हे तिन्ही आमदार टीव्हीकेच्या तिकिटावर पोटनिवडणूक लढवणार आहेत. तसा शब्द टीव्हीकेने त्यांना दिल्याचे समजते.