
सामना ऑनलाईन । चेन्नई
सोमवारी मुंबईत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपध्यक्ष अमित शाह यांनी शिवसेना भाजपच्या युतीची घोषणा केली. त्यापाठोपाठ तमिळानडूचा सत्ताधारी पक्ष अण्णा द्रमुकनेही भाजपसोबत युतीची घोषणा केली आहे. युतीच्या घोषणा केल्यानंतर केंद्रिय मंत्री पियुष गोयल यांनी तमिळनाडूतील आगामी 21 विधानसभा पोटनिवडणूकीत भाजप अण्णा द्रमुकला पाठिंबा देईल असे जाहीर केले आहे.
Tamil Nadu Deputy CM O Panneerselvam: AIADMK and BJP will have an alliance for Lok Sabha elections which will be a mega and winning alliance pic.twitter.com/WeEADmnzR6
— ANI (@ANI) February 19, 2019
तमिळनाडूचे उपमुख्यमंत्री पन्नीरसेल्वम म्हणाले की, “भाजप तमिळनाडूमध्ये पाच लोकसभा जागा लढवेल. तसेच दोन्ही पक्ष तमिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्येही निवडणूका लढवेल.” पियुष गोयल म्हणाले की, “तमिळनाडूमध्ये भाजप आणि अण्णा द्रमुक यांनी इतिहास घडवला आहे, त्याची पुनरावृत्ती आगामी निवडणूकीत होईल.” तसेच “देशात नकारात्मक राजकारणाचे वातावरण वाढले आहे. परंतु या सगळ्यात आजही पंतप्रधान मोदींवर जनतेचा विश्वास आहे. राज्यात आम्ही अण्ण्णा द्रमुकच्या नेतृत्त्वाखाली लोकांमध्ये जाऊ आणि केंद्रात नरेंद्र मोदी नेतृत्व करतील.”
Piyush Goyal, BJP: We will support AIADMK in the by-elections on 21 assembly seats in Tamil Nadu. We have agreed to contest elections in the leadership of OPS & EPS in state & in leadership of Modi Ji in center pic.twitter.com/2nUZAPHiaM
— ANI (@ANI) February 19, 2019
तमिळनाडू राज्यात एकून 39 लोकसभेच्या जागात आहेत. 2014 च्या निवडणूकीत अण्णा द्रमुकला 37 जागा जिंकण्यात यश आले होते. तर भाजपने एक जागा मिळवली होती.




























































