हवाई सुंदरीने विमानातच प्रवाशाला दिली सेक्सची ऑफर; चौकशीसाठी घेतले ताब्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विमानातच एका हवाई सुंदरीने प्रवाशाला दिलेल्या एका ऑफरमुळे ब्रिटिश एअरवेजची सध्या चर्चा सुरू आहे. ब्रिटिश एअरवेजच्या एका फ्लाईटमध्ये हवाई सुंदरीने प्रवासादरम्यान एका प्रवाशाला सेक्सची ऑफर दिली. या ऑफरची चर्चा विमानातील सर्व प्रवाशांपर्यंत पोहचली आणि एकच गोंधळ उडाला. त्यानंतर त्या हवाई सुंदरीला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेमुळे सध्या ब्रिटिश एअरवेज चर्चेत आले आहे.

या हवाई सुंदरीने याआधीही अशा ऑफर दिल्याचे सांगण्यात आले. मात्र, त्यावेळी त्या घटना उघडकीस आल्या नव्हत्या. मात्र, आता एका प्रवाशाला सेक्सची ऑफर देताना पकडण्यात आल्याने या घटना उघडकीस आल्या आहेत. या घटनांची चर्चा वाढत असल्याने ब्रिटिश एअरवेजने पोलिसांनी घटनेची माहिती दिली. पोलिसांनीही चौकशीसाठी त्या हवाईसुंदरीला ताब्यात घेतले आहे.

ही हवाई सुंदरी ऑनबोर्ड असताना आपली अश्लील छायाचित्रे सोशल मिडीयवर शेअर करत असल्याचेही सांगण्यात आले. हे फोटो शेअर करत ती प्रवाशांना सेक्सची ऑफर देत असल्याचे सांगण्यात आले. याबाबतच्या घटनांची सत्यता पडताळण्यासाठी हवाई सुंदरीला ताब्यात घेण्यात आले आहे. तिच्या चौकशीतून सत्य काय आहे, ते उघड होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

याआधी व्हिएतनामचे व्हिएनजेट या एअरवेजची अशाच कारणासाठी चर्चा सुरू होती. ही सेवा व्हिएतनामने 2011 मध्ये सुरू केली होती. या हवाईसेवेने सुरुवातीला मादक हवाई सुंदरीची मुद्दामच नियुक्ती केली होती. ही युक्ती चालली आणि देशांतर्गत सेवा देणाऱ्या या हवाई कंपनीने आंतरराष्ट्रीय उड्डाणेही सुरू केली. नियुक्त केलेल्या या हवाई सुंदरी बिकनी घालून प्रवाशांना सेवा पुरवत होत्या. त्यामुळे या कंपनीची चर्चा होती. त्यामुळे ही हवाई कंपनी बिकनी एअरलाइन्स या नावाने ओळखली जाऊ लागली.

या कंपनीच्या प्रमोशनसाठी हवाईसुंदरीचे बोल्ड फोटोशूट करून ते सोशल मिडीयावर शेअर करण्यात येत होते. त्यामुळे या कंपनीची चर्चाही वाढली आणि त्यामुळे त्यांच्या व्यवसायातही वाढ झाली. मात्र, बिकनी एअरलाइन्स अशी बदनामी होत असल्याने सरकारने याची दखल घेतली. त्यानंतर एअरलाइन्सने हवाई सुंदरींना बिकनीऐवजी शॉटर्स घालून प्रवाशांना सेवा देण्यास सांगितले. आता ब्रिटिश एअरवेजमध्ये हवाई सुंदरीने प्रवाशाला थेट सेक्सची ऑफर दिल्याने ब्रिटिश एअरलाइन्स चर्चेत आली आहे.