
एअर इंडियाने मुंबई आणि बंगळुरूवरून थेट सॅन फ्रान्सिस्कोला जाणारी विमान सेवा रद्द केली आहे. हा बदल 1 मार्चपासून लागू होईल. विमान तैनातीमधील अडचणी आणि हवाई क्षेत्रांतील प्रतिबंधामुळे वाढलेला खर्च यामुळे एअर इंडियाने हा निर्णय घेतला आहे. एअर इंडिया आता दिल्ली ते सॅन फ्रान्सिस्को आणि टोरँटोला जाणारी उड्डाणे वाढवणार आहे. दिल्लीवरून आता आठवडय़ाला 10 उड्डाणे होतील. मात्र बंगळुरू आणि दिल्लीवरून थेट विमान नाही.


























































