
विमान प्रवासात लहान मुलं अनेकदा कंटाळून रडतात. अशाच एका कंटाळलेल्या लहान मुलीने विमानात रडून हैदोस घातला होता, अखेर तिला शांत करण्यासाठी एक विमान कर्मचारी धावत गेला. त्याने तिला उचलून घेत असे काही केले त्याने सगळ्यांनाच आश्चर्य वाटले. हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत असून लक्षवेधक ठरत आहे. या व्हिडीओने लाखो युजर्सची मने जिंकली आहेत.
व्हायरल झालेला हा व्हिडिओ जीवन व्यंकटेश नावाच्या एका इंस्टाग्राम युजरने शेअर केला आहे, ज्याच्यासोबत फोटो कॅप्शन देण्यात आली आहे. त्यामध्ये लिहीले आहे की, @airindia.in कर्मचार्यांच्या उत्तम पाहुणचाराचे खरोखर कौतुक करा, माझ्या मुलीला त्या एका कर्मचाऱ्याने उचलून घेत खांद्यावर थोपटले आणि त्यावेळी ती शांत झाली त्याचे आश्चर्यच वाटले. त्यासाठी मनापासून आभार. टाटांनी ताबा घेतल्यानंतर या प्रवासात बरेच बदल दिसल्याचे त्याने लिहीलेय. नील मलकम असे त्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.
हा व्हिडिओ 7 ऑगस्ट रोजी पोस्ट करण्यात आला होता. व्हिडिओ व्हायरल होताच, वापरकर्त्याने त्याच्या कॅप्शनमध्ये इन्स्टाग्रामवर क्रू मेंबरच्या भेटीबाबत पुष्टी केली. काही दिवसांपूर्वी त्याचे कॅप्शन अपडेट करताना त्याने कॅप्शन लिहिले होते, ‘अपडेटः मला ते सापडले जे माझ्या मुलीला घेऊन फिरवत होते. ते @neil_nitin_ub आहे, ते व्हायरल केल्याबद्दल आणि त्याच्यापर्यंत पोहोचल्याबद्दल सर्वांचे आभार. आतापर्यंत या व्हिडिओला 1 लाख 91 हजारांहून अधिक लोकांनी लाईक्स केले आहे.

























































