
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांचा 13 जून रोजी वाढदिवस आहे. या दिवशी आदित्य ठाकरे हे शिवसैनिकांना भेटणार होते. मात्र अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी वाढदिवस न साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.
I have decided to not celebrate my birthday tomorrow, as earlier planned, with those wanting to meet and greet me personally.
Seeing today’s tragic events that have unfolded, my prayers, like everyone else’s are with the victims and their families.
I will humbly request…
— Aaditya Thackeray (@AUThackeray) June 12, 2025
”मला भेटायला येणाऱ्या व्यक्तींसोबत उद्या मी माझा वाढदिवस साजरा करणार होतो. पण आज अहमदाबाद येथे झालेल्या दुर्घटनेनंतर मी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या संवेदना या दुर्घटनेतील पीडितांसोबत व त्यांच्या कुटुंबियांसोबत आहेत. माझी सर्वांना विनंती आहे की जे कुणी उद्या माझ्या वाढदिवसानिमित्त मला शुभेच्छा द्यायला येणार होते त्यांनी येऊ नये. माझ्या विनंतीला मान द्यावा”, असे आदित्य ठाकरे यांनी ट्विट केले आहे.