
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
आर्थिक गर्तेत सापडलेल्या एअर इंडियाच्या आर्थिक तसेच सेवा देण्याच्या कामगिरीत लक्षणीय सुधारणा झाली असली तरी एअर इंडियाचे या वर्षाअखेरीला खासगीकरण होणार असल्याचे नागरी विमान उड्डाण प्राधिकरणाने म्हटले आहे. केंद्राने यासाठी परवानगी दिली आहे. तसेच मंत्री गटानेही 2018च्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे वर्षअखेरीपर्यंत खासगीकरण होईल, असे प्राधिकरणाने स्पष्ट केले.

























































