
अमेरिका आणि इराणमध्ये पुन्हा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. रविवारी सकाळी इराकची राजधानी बगदादमधील अमेरिकेच्या दुतावासावर रॉकेट हल्ला झाला.
अमेरिकन सैन्याच्या सुत्रांनुसार अमेरिकेच्या ठिकाणांवर हा 19 वा हल्ला आहे. अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला होणे ही फार चिंताजन बाब समजली जाते. या हल्ल्यात नेमके किती नुकसान झाले याची माहिती अद्याप मिळालेली नाही. तसेच दुतावासाजवळ नंतर स्फोटाचे आवाज येत होते. स्फोटांच्या आवाजानंतर ग्रीन झोनजवळ अनेक लढाऊ विमानेही दिसली.




























































