अजय देवगणचा तान्हाजी कसा दिसतोय पाहा…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांसोबत प्राणांची बाजी लावून स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्या नरवीर तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित तान्हाजी या चित्रपटाचे चित्रकरण वेगाने सुरू आहे. ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ या चित्रपटात अजय देवगण मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

तान्हाजी या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये चित्रपटांची शंभरी पूर्ण करणाऱ्या अजयने आपला तान्हाजीमधला लूक शेअर केला आहे. डोक्याला असलेले मुंडासे आणि नजर रोखून पाहणाऱ्या तानाजी मालुसरे यांच्या रुपात अजय देवगण दिसत आहे. अजयची पत्नी काजोल हिने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून अजयला त्याच्या 100व्या चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

काही दिवसांपूर्वीच तान्हाजी चित्रपटाचं एक पोस्टर प्रदर्शित झालं होतं. त्यात अजय देवगणसोबत अभिनेता सैफ अली खान दिसून येत होता. सैफ अली खानही या चित्रपटात झळकणार आहे. तसंच, अजयची पत्नी अभिनेत्री काजोल हीसुद्धा तान्हाजीमध्ये दिसणार आहे. ओम राऊत दिग्दर्शित तान्हाजी हा चित्रपट 10 जानेवारी 2020 रोजी प्रदर्शित होत आहे.