Video – अजय गोगावलेचा देवीचा गोंधळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गायक-संगीतकार अजय गोगावले यांनी यल्लमा देवीचा जागर करीत तिचा गोंधळ घातला आहे. ‘नाइंटीनाईन प्रोडक्शन्स’ आणि ‘बहुरूपी प्रोडक्शन्स’ची निर्मित आगामी ‘सोयरिक’ या मराठी चित्रपटासाठी त्यांनी हा गोंधळ गायला आहे.

‘डोई धरीला धरीला आईचा देव्हारा, भाळी लाविला लाविला देवीचा भंडारा…पाला लिंबाचा बांधिला, तुझा मळवट भरीला, तुझी भरून गं वटी, तुला निवद दाविला…आई गोंधळ मांडिला ये गं तू जागरा, येल्लू आईचा उधं उधं…’ असे या गाण्याचे बोल आहेत. हा गोंधळ गीतकार वैभव देशमुख यांनी लिहिला असून विजय गावंडे यांनी संगीतबद्ध केला आहे. गोंधळाबद्दल अजय गोगावले म्हणाले, ‘जोगवा’ नंतर ‘सोयरिक’ चित्रपटामुळे मला परत गोंधळ गाण्याची संधी मिळाली आहे. विजयसोबत याआधी काम केल्याने ‘मळवट’ या गोंधळासाठी छान टय़ूनिंग जमलं.