शब्दांत वर्णन करू शकत नाही, सहकाऱ्यांचा अभिमान – रहाणे

ब्रिस्बेन कसोटीत हिंदुस्थानने विजय साकारल्यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणे भावुक झाला. तो म्हणाला, आमच्यासाठी हा मालिका विजय खूप मोठा आहे. या विजयाचे शब्दांत वर्णन करू शकत नाही. संघातील प्रत्येक सहकाऱ्याचा मला अभिमान वाटतो. निकालाकडे लक्ष न देता आम्ही सर्वोत्तम प्रयत्न केला, असे तो पुढे आवर्जून म्हणाला.

माझ्या कारकीर्दीतील सर्वोत्तम क्षण – रिषभ पंत

ब्रिस्बेन कसोटीतील हीरो रिषभ पंत याने हा क्षण आपल्या कारकीर्दीतील सर्वोत्तम असल्याचे भावुक उद्गार यावेळी काढले. तो पुढे म्हणाला, ही मालिका माझ्यासाठी स्वप्नवत ठरली. संघ व्यवस्थापन नेहमीच माझ्या पाठीशी उभे राहिले. मी मॅचविनर असल्याचे त्यांच्याकडून सातत्याने सांगण्यात येत होते. माझ्या डोक्यातही तेच फिरत होते. अखेरीस ब्रिस्बेन कसोटीत मला देशाला विजय मिळवून देता आला, असेही तो पुढे म्हणाला.

आपली प्रतिक्रिया द्या