दोन वर्षे अन् 29 डावांनंतर अजिंक्य रहाणेचे दमदार शतक

649

वर्ल्ड कपमध्ये संधी न मिळालेल्या मुंबईकर अजिंक्य रहाणे याने तब्बल दोन वर्षे आणि 29 डावांनंतर कसोटी शतक झळकावले. पहिल्या डावात महत्त्वाच्या क्षणी 81 धावा तडकावणाऱया अजिंक्य रहाणे याने रविवारी येथे सुरू असलेल्या वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या दुसऱया डावात झुंजार शतक साजरे केले. हे त्याचे दहावे शतक ठरले. अखेरचे वृत्त हाती आले तेव्हा अजिंक्य रहाणे 102 धावांवर बाद झाला होता, तर हनुमा विहारी 80 धावांवर खेळत होता. पहिल्या डावात 297 धावा फटकावणाऱया हिंदुस्थानच्या दुसऱया डावात 5 बाद 322 धावा झाल्या होत्या.

हिंदुस्थानने तीन बाद 185 या धावसंख्येवरून पुढे खेळायला सुरुवात केली. पण कर्णधार विराट कोहलीला ऑफस्पिनर रोस्टन चेसने 51 धावांवर बाद करीत मोठा अडसर दूर केला. त्यानंतर अजिंक्य रहाणे व हनुमा विहारी या जोडीने हिंदुस्थानच्या धावसंख्येला ब्रेक लागणार नाही याची काळजी घेतली. दोघांनी वेस्ट इंडीजच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. दोघांनी 135 धावांची भागीदारी रचली. शॅनोन ग्रॅबियलने अजिंक्य रहाणेला बाद केले.

आपली प्रतिक्रिया द्या