राज कुंद्राच्या अटकेनंतर अजिंक्य रहाणे ट्रोल, जुने संभाषण व्हायरल

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्रा याला पॉर्न फिल्म रॅकेटप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. राज कुंद्राच्या अटकेनंतर सोशल मीडियावर लोकांनी त्याच्याविरोधात राग व्यक्त केला. शिल्पा व राजवर मोठ्या प्रमाणात टीका झाली. राजमुळे शिल्पा नंतर आता टीम इंडियाचा क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला आहे. अजिंक्य व राजमधील ट्विटरवरचे एक जुने संभाषण सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

raj-kundra

19 ऑक्टोबर 2012 साली अजिंक्यने राज कुंद्राच्या एका सामाजिक कार्यासाठी त्याची स्तुती करणारे ट्विट केले होते. त्यात त्याने सर, तुम्ही चांगले काम करत आहात असे सांगितलेले. त्यानंतर राज कुंद्राने त्याचे आभार मानत तुम्ही आमचे काम लाईव्ह बघायला या असे रहाणेला सांगितले. त्यावर रहाणेने मी नक्की येईन असा रिप्लाय दिला. त्या ट्विटचे स्क्रीन शॉट सोशल मीडियावर शेअर करून नेटकरी अजिंक्य रहाणेला ट्रोल करत आहेत.

&

बस कंडक्टर होते राज कुंद्राचे वडील, असा झाला कोट्यधीश

अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिचा नवरा राज कुंद्रा (Raj Kundra) हा उद्योगपती असल्याचे सांगायचा. त्याचे सगळे उद्योग मुंबई पोलिसांनी शोधून काढले आहेत. कुंद्रा हा अश्लील उद्योग कंपनीमुळे (Porn Industry) मालामाल झाल्याचं आतापर्यंतच्या तपासात उघडकीस आलं आहे. लंडनस्थित भावोजीच्या सहकार्याने ‘हॉटशॉट्स’ (HotShots) अॅपच्या माध्यमातून अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्रा याने पॉर्न फिल्मचा उद्योग केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. कुंद्राच्या कार्यालयात पॉर्न फिल्म्सबाबत महत्त्वाचे धागेदोरे हाती लागल्यानंतर त्याला व त्याच्या कंपनीचा आयटी प्रमुख रायन थॉर्प याला सोमवारी रात्री अटक केली होती. मंगळवारी दोघांना कोर्टात हजर केले असता त्यांना 23 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

shilpa-shetty-raj-kundra

आपली प्रतिक्रिया द्या