
हे सरकार सत्तेवर येऊन सहा महिने झाले असले, तरीही अजून मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला नाही. बंडखोरी केलेल्या प्रत्येकाला मंत्रिपदाचे गाजर दाखवले होते. मंत्रिपदाच्या आशेने 40 बंडखोर आमदारांपैकी बऱयाच जणांनी नवीन सूट शिवून घेतले. या सूटची घडी कधी मोडणार, असा सवाल त्यांच्या बायका विचारत आहेत. मंत्रिपदासाठी त्यांनी नवस केले, अभिषेक केले; पण नवस फेडायला अजून मंत्रिपद काही मिळाले नाही. मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याची सरकारला भीती वाटत आहे. राज्याची अशी अवस्था यापूर्वी कधीही पहिली नव्हती, असा हल्लाबोल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे.
सरकार येतात व जातात. कोणीच सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही, असेही अजित पवार यांनी राज्य सरकारला सुनावले.





























































