महाराष्ट्राच्या निवडणुकीत जम्मू-कश्मीरचा मुद्दा कशाला? पवारांचा सवाल

1541

राज्यात होऊ घातलेल्या आगामी विधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. शनिवारी निवडणूक आयोगाने राज्यात आचारसंहिता लागू केली आणि निवडणुकीच्या तारखाही जाहीर केल्या. निवडणुकीचा बिगूल वाजल्यानंतर रविवारी राज्यात एकीकडे अमित शहा यांनी भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टिका केली.

शरद पवारांची पाठ फिरताच राष्ट्रवादीत दोन गटात वाद

370 कलम हटवण्यास विरोध करणाऱ्यांना जागा दाखवा-अमित शहा

महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये जम्मू-कश्मीर आणि कलम 370 चा मुद्दा कशाला? असा सवाल अजित पवार यांनी केला आहे. शहा यांनी मुंबईत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना 370 कलम आणि जम्मू-कश्मीरच्या मुद्द्यावर भाषण केले. याच भाषणाकडे अजित पवार यांचा रोख होता. भाषणात फक्त 370 चा मुद्दा, जम्मू-कश्मीर आणि पाकिस्तानचाच उल्लेख होत आहे. त्यामुळे मूळ समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे, असे म्हणत अजित पवार यांनी शेतकरी, महिलांच्या समस्यांवरून निशाणा साधला.

महाजनादेश यात्रेवर टिका
भाजपच्या महाजनादेश यात्रेवर अजित पवारांनी कडाडून हल्ला चढवला. महाराष्ट्र पाण्यात गेला तरी यांची यात्रा सुरू होती. सभा संपेपर्यंत अनेकांना स्थानबद्ध करण्यात आले, लोकशाहीत असे असते का? असा सवाल उपस्थित अजित पवार यांनी केले. सत्तेचा गैरवापर सुरू आहे, असा आरोपही त्यांनी केला. तसेच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. मात्र आमच्यावेळी दीड महिना आचारसंहिता असायची. सध्या सत्तेचा दुरुपयोग सुरू आहे. सत्तेची नशा आणि मस्ती चढल्याने हे असे निर्णय घेतले जात आहेत, असे अजित पवार म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या