Ajit Pawar Plane Crash – अजित पवार यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी ११ वाजता होणार अंत्यसंस्कार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार होणार आहे. बारामतीमधील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अंत्यस्कार करण्यात येतील. शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार असल्याने प्रशासनाकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात आज रात्री १० वाजेपर्यंत आणि उद्या सकाळी ६ ते ९ यावेळेत काटेवाडी येथे अजित पवार यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेता येणार आहे. आणि त्यानंतर अजित पवार यांची अंत्ययात्रा निघेल. बारामतीमधील विद्यानगरी चौकातून विद्या प्रतिष्ठानपर्यंत निघेल. आणि सकाळी ११ वाजता पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

एक खंबीर नेता व माझ्या मंत्रिमंडळातील मी उमदा सहकारी गमावला; उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला शोक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बारामतीमध्ये पोहोचले आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे काका शरद पवार यांना फोन केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे अंत्यसंस्कारासाठी येतील, अशी माहिती समोर येत आहे.

अजित पवार यांचे पार्थिव विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांनी विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर यावे, असे आवाहन पवार कुटुंबियांकडून बारामती रुग्णालयाच्या बाहेर करण्यात आले. यानंतर रुग्णालयातून अजित पवारांचे पार्थिव बाहेर काढण्यात आले.

Ajit Pawar plane crash – विमान अपघातापूर्वी अजित पवारांचा ‘हा’ फोटो ठरला अखेरचा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने बारामतीकरांना मोठा धक्का बसला असून संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे. राज्य सरकारने तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. बारामतीवर शोककळा पसरली असून बारामती रुग्णालयाबाहेर हजारोंच्या जनसमुदायाने गर्दी केली आहे. अजितदादांच्या अंत्यदर्शनासाठी कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी झाली आहे. अजित पवार अमर रहे, अशा घोषणा कार्यकर्ते देत आहेत.