Ajit Pawar Plane Crash – भावाला पायलट बनवण्याचं स्वप्न अधुरं राहिलं… पिंकी माळीच्या मृत्यूने सर्वच हळहळले

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी बारामती येथे विमान अपघातात निधन झाले. या भीषण विमान अपघातात अजित पवारांसह अन्य चार जणांचा मृत्यू झाला. या चार जणांमध्ये वरळीतील रहिवाशी 29 वर्षीय पिंकी माळी यांचा सुद्धा समावेश होता. फ्लाईट अटेन्डेंट म्हणून त्या कार्यरत होत्या. भावाला पायलट करण्याच स्वप्न त्यांनी उराशी बाळगलं होतं. मात्र, त्यांचं स्वप्न अधुरं राहील असून माळी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

माझ्या मुलीने काल फोन करून सांगितले की, मी अजितदादा पवार यांच्यासोबत बारामतीला जाणार आहे. बारामतीमध्ये अजितदादांना सोडल्यानंतर नांदेडला जाणार आहे, हे तिचे माझ्यासोबत बोलतानाचे शेवटचे शब्द होते, माध्यमांशी संवाद साधताना पिंकी माळी यांचे वडील शिवकुमार माळी यांनी टाहो फोडला. अजित पवारांसोबत दौरा करताना ती खूप आनंदी होती. अजित दादांसोबत चौथ्यांदा ती विमान प्रवास करत होती. भावाला पायटल करण्याचं तिचं स्वप्न होतं. सकाळी दौऱ्यावर जातेवेळी तिने भावाला फोन केला होता. मात्र, त्यानंतर तिच्याशी कुठल्याची प्रकारचा संपर्क होऊ शकला नाही, अशी माहिती शिवकुमार माळी यांनी दिली. पिंकी माळीच्या मृत्यूमुळे कुटुंब हादरून गेलं आहे. वरळीतील सेन्चुरी मिल परिसर पिंकीच्या मृत्युमुळे शोकसागरात बुडाला आहे.