पाच वर्षात फक्त उद्योगपतींचाच विकास झाला – अजित पवार

494
ajit-pawar-in-speech

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रचाराची रणधुमाळी वाढली आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पिंपरीमध्ये घेतलेल्या प्रचारसभेत राज्य सरकारवर टीका केली. सरकारला सामान्य जनता आणि शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यात अपयश आले आहे. गेल्या पाच वर्षात फक्त अंबानी, अदानी यांची संपत्ती वाढली आहे. श्रीमंताच्या यादीत अंबानी अव्वल स्थानी असून अदानी दुसऱ्या स्थानावर आहेत. त्यामुळे पाच वर्षात फक्त उद्योगपतींचाच विकास झाला आहे. मात्र, सामान्य जनतेची आणि शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाल्याचे अजित पवार म्हणाले.

राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा का येत आहेत. हरियाणा महाराष्ट्रात केंद्रीय मंत्र्यांनी ठाण मांडले आहे. एका केंद्रीय मंत्र्यांनी मंदी असल्याचे वृत्त फेटाळले. 2 ऑक्टोबरला प्रदर्शित झालेल्या चित्रपटांनी 120 कोटींचा व्यवसाय केला असे सांगत मंदी कुठे आहे असे ते म्हणाले. मात्र,चित्रपट आणि मंदीचा काय संबंध आहे, असा सवाल करत त्यांनी या विधानावर टीका केली. सरकारच्या अयोग्य धोरणांमुळे शेतकऱ्यांना पीकविम्याचे पैसे मिळत नाही. जीवनावश्यक वस्तू योग्य भावात मिळत नाही. काद्यांला पैसे मिळत असताना केंद्राने निर्यातबंदी केली. त्यामुळे कांद्याचे भाव घसरून शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे, असा आरोपही त्यांनी केला. आमच्या कार्यकाळात शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळून सामान्य जनतेला योग्य भावात वस्तू मिळतील असे धोरण राबवण्यात आले. आमच्या सरकारने शेतकऱ्यांची कर्ज माफ केली, असा दावा करतानाच आता जनता आणि शेतकऱ्यांकडे कोणीही लक्ष देत नाही, असेही ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या